कधी कधी तेच शोधत राहत,
जे सीमा ओलांडून खूप दुरुन हसतं असतं
बुद्धी बजावते अरे बस कर हे गणिताचे पाढे,
काही समीकरणं नकळत निकाल लाऊन उभी आहेत पुढे
त्या न संपणाऱ्या प्रवासात गाडीचे breaks तर सापडतात,
पण मनाचे हरवलेले सूर मात्र संगीत अधुरंच ठेऊन जातात
खेळ चालूच राहतो Stations मागे टाकून मी मात्र पळत राहतो
वाट पाहतो अश्या एका Stop ची एका शांत हाकेची,
त्याच आशेत मी निराशा सहन करत राहतो
प्रत्येक वळणावर पाहतो वळून वळून
कि हेच का ते वळण जे देईल हरवलेलं मिळवून
मी फक्त सोडतो आहे हातातून
अस काहीतरी सापडेल का जे ठेवेल घट्ट धरून
मात्र इशारे तर सापडत नाहीत
गाडी पण थांबत नाही
मग मी आता वाट पाहतो
त्या एका Stop ची जिथे मीच जाईन मला विसरून !!
- शर्वरी
No comments:
Post a Comment