Saturday, January 7, 2017

"कविता"



 कविता हि असावी कशी ? कविता हि असावी कशी?
वाचता भावनांची घडी उलगडावी जशी
मनाने  काव्यरचनेचे  चढावे जिने
आणि  डोळ्यांसमोर अलगद चित्र उभे राहावे पुढे
वाचताना  ऐकताना गुंतून जावे इतके
कि काव्यात सापडावे  प्रतिबिंब स्वतःचे
जसे मनाच्या आकाशात अचानक  मेघ  दाटून यावेत
तर कधी उदास चेहऱ्यावर हसू ओढून यावे
कधी कळूनही न  कळणारी
तर कधी  न कळूनही  कळणारी अशी मृगजळा परि
कधी सूर तालात बांधलेली धुंद अशी लाट
तर कधी शांत  अशी ती एकटी संध्याकाळ
कधी अचानक अनेक चेहरे भासवणारी
आठवणींच्या जगात खेचून नेणारी
तर कधी एक आनंदाची मोहक वाट
 चालता चालता न  थकता मन रूळवणारी
अशी  एकमेव कवीच्या प्रवासात साथ देणारी ती  एक  अपरिचित वाट !!
                                                                                                        - शर्वरी

No comments:

Post a Comment